June 30, 2025 4:30 am

“भैय्या कहा के हो” विचारल्याने व्यावसायिकाने केला गोळीबार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुणे : शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी कहा के हो असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणीनगरमध्ये सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा व चोरी, मारहाण असे दोन गुन्हे दाखल केले आहेत.

अमित सत्यपाल सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा बँड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी आहे. ते सिलीकॉन बे येथे रहातात. सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करुन ते बाहेर फिरायला गेले होते. तेथील रस्त्याच्या शेवटी एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. सिंग काही वेळात तेथे गेले. तेव्हा त्यांना या तरुणांनी कहा के हो, अशी विचारणा केली. त्यानंतर ते परत आले. त्यांनी आपली कार काढून हे तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती घेण्यासाठी ते तिकडे गेले. त्यावेळी या तरुणांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते कार मधून बाहेर आले असताना या तरुणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत फायर केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत आपली सोन्याची चैन गहाळ झाली असून या तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्याचे अमित यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्या विरोधात नवनाथ गलांडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चौकशी करुन दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!