मदनवाडी ग्रामपंचायत च्या हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
(निलेश गायकवाड )
महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदनवाडी ग्रामपंचायत कठीबध्द आहे असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच सौ अश्विनी मारुती बंडगर यांनी केले.
ग्रामपंचायत मदनवाडीच्या वतीने 23 जानेवारी रोजी वेंकटेश लॉन्स येथे हळदी कुंकू कार्यक्रम व महिलांसाठी आरोग्य तपासणी व संगीत खुर्ची व उखाणे आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले.यावेळी मदनवाडी परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी कार्यक्रमात तक्रारवाडी, मदनवाडी, कुंभरगाव, तसेच भिगवण परिसरातील आजी माजी सरपंच व आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र तक्रारवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच यांच्यासह गावातील आलेल्या बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.