एस आर जे सोशल फाऊंडेशन दौंड आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद विद्यालय येथे युवा नेतृत्व अमोल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 131 पिशवी रक्त संकलन करण्यात आले
5 वर्षाच्या आतील 129 लहान मुलांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात आली
पोष्टाची विशेष विमा योजनेत 24 नागरिकांची विमा पॉलिसी काढण्यात आली
तसेच मोफत 350 मोतीबिंदू तपासणी करण्यात आली आणि 27 जणांना शस्त्रक्रिया साठी निवडले गेले तसेच 56 लोकांना चष्मे देण्यात आले व 177 व्यक्तीचा शरीरातील चरबीचे प्रमाण तपासणी शिबिरात करण्यात आली प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगराधक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले व अमोल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अनिल सोनवणे, बबलू कांबळे,नंदू पवार,राजेश पाटील, संतोष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
