अजित पवारांनी तारतम्य ठेऊन बोलावे – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी
शिरपूरात भाजपा तर्फे अजित पवार यांचा निषेध
शिरपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिरपूर भाजपा तर्फे निषेध करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली येथील विजयस्तंभा जवळ (दि. २ डिसेंबर) रोजी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांचा विरोधात घोषणाबाजी करत निषेध व धिक्कार करत अजित पवार यांचा फोटोला काळे फासण्यात येवुन चप्पलाने मारण्यात आले. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, माजी पं. स. सभापती नाना कोळी, माजी नगराध्यक्षा सौ. संगिता देवरे, माजी नगरसेविका सौ. मोनिका शेटे, सौ, पल्लवी पाटील, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, शिसाका माजी संचालक जयवंत पाटील, प्रभाकर सोनवणे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, मनोज राजपुत, जयवंत राजपुत, दिनेश पाटील, कुणाल माळी, ओमप्रकाश दायमा, माजी जिप. सदस्या सौ. कल्पना राजपुत, माजी पं. स. सदस्या सौ. रंजना गुजर, सौ. कल्पना कोळी, माजी नगरसेविका सौ. स्मिता नाईक, सौ. शालिनी सोनवणे, सौ. कविता बाविस्कर आदि उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोलले पाहिजे. कारण, छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी स्वराजासाठी त्याग केला. संभाजी महाराजांवर औरंगाजेबाने अत्याचार केले, तरीही धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही असे हि बबनराव चौधरी म्हणालेत. नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपाने निषेध केला असून माफीची मागणी केलेली आहे.
