दौंड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – शहरात बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभा यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे ०१ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरे गाव येथील महार बटालियन च्या शौर्याचे प्रतिक असलेल्या विजयस्तंभाची प्रतिकृती विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारून महार बटालियन सैनिकांना मानवंदना देण्यात आली व भिमगिते लाऊन नववर्ष साजरे करण्यात आले यावेळी
उमाकांत कांबळे बसपा पुणे जिल्हा सचिव ,मच्छिंद्र डेंगळे
बसपा दौंड विधानसभा नेते नितीन डाळिंबे बसपा दौंड विधानसभा,विशाल सोनवण
अध्यक्ष बसपा दौंड विधानसभा तसेच
बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभा व शहर कमिटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.व मानवंदना देण्यासाठी शहरातून असंख्य जन समुदाय उपस्थित होता.