लोकशाही पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची व उपअध्यक्षांची निवड
शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल चा आनोखा उपक्रम ठरतो शाळेसाठी प्रेरणादायी
प्रतिनिधी. संदीप कायगुडे
कर्जत:तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकशाही पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची उपअध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक मते गणेशवाडीचे संतोष कायगुडे यांना मिळाली म्हणुन त्यांना अध्यक्ष तर दोन नंबरची मते अर्चना हरिहर यांना मिळाली त्यांमुळे त्यांस उपाध्यक्ष अशी निवड करण्यात आली यामध्ये. सर्व पालकांचे प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मतदान केले.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सचिन बनकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास बांबोऱ्याचे पालक राहुल गायकवाड यांनी ५००० रुपयाची देणगी दिली. या निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सत्कार शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देविदास गोडसे सर व प्रा.संतोष रणदिवे सर यांनी केला.
यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थ्यांचे पालक, बस चालक, विद्यार्थी, शालेय कर्मचाऱ्यासह शिक्षक उपस्थित होते.
शंभूराजे इंग्लिश मेडियम स्कूल शालेय व्यवस्थापन समिती च्या या लोकशाही पॅटर्नचे सर्व माध्यमातून कौतुक होत आहेत.
