कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आशिष बोरा; उपाध्यक्षपदी महम्मद पठाण व विश्वास रेणूकर
कर्जत येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठक
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत दि.३० कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आशिष बोरा यांची तर उपाध्यक्षपदी महम्मद पठाण, विश्वास रेणूकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्यावर्षीप्रमाणे पदवीधर पत्रकार संघाची बैठक कर्जतच्या शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली.मावळते तालुकाध्यक्ष दत्ता उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची निवड पार पडली.गतवर्षीच्या काळात संघटनेला आलेल्या अडचणी तसेच भविष्यात सामाजिक दृष्टीकोण ठेऊन काय-काय उपक्रम राबवता येईल? याबाबत उकिरडे यांनी मार्गदर्शन केले.
सध्या पत्रकारीता क्षेत्रांत वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा वाढलेली आहे.त्यातच कमर्शियलमुळे पत्रकारितेचा दर्जा आणखीनच घसरलेला दिसतो. सोशल मीडियाबरोबरच न्यूज पोर्टल,नवनवीन ऑनलाईन वृत्तपत्रांचे वाढते प्रमाण यामुळे ‘वास्तव’ व ‘दर्जा’ यामधील तफावत दिसून येते. सकारात्मक पत्रकारितेतून समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टींची जोपासना पत्रकारांनी करणे गरजेचे असल्याची यावेळी बैठकीत चर्चा झाली.
यावेळी नुतन अध्यक्ष आशिष बोरा म्हणाले, ‘पत्रकारांनी समाजातील विविध दुर्लक्षित प्रश्नांवर लिखाण केले पाहिजे. समाजाभिमुख पत्रकारिता करत असताना सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. सध्या बदलत चाललेली पत्रकारिता पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने लोकांसमोर कशी आणता येईल? यासाठीही प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.दिलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या उन्नतीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू’.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
• अध्यक्ष :- आशिष बोरा
• उपाध्यक्ष :- महम्मद पठाण,विश्वास रेणूकर
• कार्याध्यक्षः- आशिष निंभोरे
• सचिव: – डॉ. अफरोज पठाण
• सहसचिव:- दिलीप अनारसे
• खजिनदार:- सुनिल कांबळे
• समन्वयक : संजय कांबळे
• जिल्हा प्रतिनिधी:- दत्ता उकिरडे
•कायदेशीर सल्लागार:- अॅड.विजय सोनवणे
कार्यकारीणी सदस्य:
सचिन गुरव,मुन्ना पठाण, सतिष परदेशी, राजेंद्र घोडके, राजाराम माने, बाळासाहेब सुपेकर, भाऊसाहेब वाडगे,संदिप कायगुडे, शाहरुख पठाण, राजेंद्र माने, संजय यादव, सुनिल खामगळ,अशोक सुर्यवंशी, तुषार गायकवाड, शिवराज सुर्यवंशी.
समाजातील ‘त्या’ मान्यवरांचा होणार गुणगौरव!
विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण,पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तींचा किंवा संस्थांचा कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.या पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.