मदनवाडी: कारभारी कोण? फैसला ‘ईव्हीएम’ मध्ये कैद
(निलेश गायकवाड )
काल झालेल्या मदनवाडी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत 80 % मतदान झाले . सर्वत्र मतदान शांततेत झाले असून गावच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. गावात मोठा उत्साह दिसून आला. तालुक्यातील नेत्यांनी मदनवाडीच्या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली पाहयला मिळाली. किरकोळ प्रकार वगळता गावात सर्वत्र शांततेत मतदान झाले. महिलांमध्ये प्रथमच उत्साह दिसून आला.
सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांग लावलेली पाहायला मिळाली. तसेच विरवाडी, बंडगरवस्ती, मदनवाडी येथे मतदारांची थोडीशी धांदल उडालेली पाहायला मिळाली कारण वार्ड फोडल्याणे. प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. बाहेरच्या मतदारांनीही रविवार, सुटीचा दिवस असल्याने गावात येऊन मतदानाचा हक्क बजावला.सरपंच जनतेतून असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण यंदाच्या मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून आले.
यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण होणार सरपंच बंडगर, देवकाते का अपक्ष….
काल मतदान होताच प्रत्येकाने झालेल्या निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान झाले व कोणत्या वार्डामध्ये किती मतदान झाले याची आकडेमोड चौका चौकात सुरू होती. जो तो आपापल्या सोयीप्रमाणे आकडेमोड लावत होता. अनेक चर्चेना उधाण येत होते.
यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळालेली होती. प्रत्येक उमेदवाराने दिवस रात्र एक करत मतदारांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कसे पोहोचता येईल व त्याचे मतदान कसे आपल्याला करून घेता येईल याची गणितं संपूर्ण दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले. झालेल्या निवडणुकीमध्ये भरपूर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यंदाच्या निवडणुकीमध्ये तीन पॅनल व दोन अपक्ष उभे असल्याने प्रत्येकाची डोकेदुखी झालेली होती. त्यात धनशक्तीचा देखील मारा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. मदनवाडी ग्रामपंचायत वरती देवकाते व बंडगर या कुटुंबाने वेळोवेळी वर्चस्व ठेवलेले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र सरपंच हा जनतेतून निवडून येत असल्याने बंडगर विरुद्ध देवकाते अशी लढत पाहायला मिळाले. त्यात बंडगर विरुद्ध बंडगर देखील लढत होत असल्याने काही ठिकाणी आकडेमोड करताना चिंतेची बाब समोर येऊ येऊन ठेपली. काहींच्या चर्चेतून विविध तर्कवितर्क समोर येऊ लागले . सध्या उद्या इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी मदनवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे. कोण होणार मदनवाडी ग्रामपंचायत चा सरपंच? कोणाची सत्ता मदनवाडी ग्रामपंचायत वर येणार? आणि कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडणार? याकडे सध्या संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.