June 30, 2025 5:25 am

गावठी कट्टसह आरोपी एमआयडीसी पोस्टेच्या शोध पथकाच्या ताब्यात…

अपनी भाषा में पढ़े! Translate

गावठी कट्टसह आरोपी एमआयडीसी पोस्टेच्या शोध पथकाच्या ताब्यात…

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची कामगिरी….

जळगाव- एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं.873/2022 आर्म अॅक्ट कलम-3/25 तमेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 [1][3] चे उल्लंघन प्रमाणे दिनांक 17.12.2022 रोजी 21.47 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हांत मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो यांनी आर्म अॅक्ट गुन्हांची माहीती काढुन कार्यवाही करणे बाबत आदेश केले होते. दिनांक 17.12.2022 रोजी सायंकाळी 18.00 वाजता एम आय डी सी पोस्टे गुन्हे शोध पथकाती पोना विकास सातदिवे यांना माहीती मिळाली की, दोन इसम है अजिंठा चौफुली येथे गावठी कट्टासह फिरत आहे त्यावरुन सदरची माहीती मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांना कळविले वरुन शोध पथकातील कर्मचारीचे पथक तयार करुन जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे गेले असता आरोपी 1] अक्षय प्रकाश घारु वय 21, 2] नितीन देविदयाल सालवें वय-25 दोघे रा. फुकटपुरा, ब-हाणपुर मध्यप्रदेश असे असुन त्यापेकी आरोपी क्र. 01 यांच्या कब्जात 20,000/- रु किची विनापास परवाना शिवाय अनाधिकृत एक गावठी कट्टा मिळुण आला आहे तसेच मा. जिल्हाधिकारी सो, यांनी पारीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन मिळुन आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो, व मा. अपर पोलीस ” अधिक्षक श्री चंद्रकात गवळी सो, व मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो, जळगाव ” भाग जळगाव व मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो एम आय डी सी पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सफ आनंदसिंग पाटील, पोहेकॉ सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश शिरसाळे, पोकॉ किरण पाटील अशांनी केली असुन सदर गुन्हांचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!