भाजपा आमदाराने केले कट्टर शिवसैनिकाचे मनापासून कौतुक
सद्या सत्तांतर नाट्यामुळे सर्वत्र वातावरण गढूळ झालेले असताना भाजपाच्या विद्यमान आमदाराने एका कट्टर शिवसैनिकाचे जाहिर कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केले.
ही आगळी वेगळी घटना घडली ती हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात.या वेळी भाजपाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार व कट्टर शिवसैनिक म्हणुन सुपरिचित असलेले दिलीप मालवणकर हे एकाच व्यासपिठावर उपस्थित होते.आमदार डाॅ.बालाजी किणीकर यांनी मात्र अज्ञात कारणास्तव दांडी मारली. या वेळी आमदार गणपत गायकवाड यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत, जिथे जिथे अन्याय दिसतो तिथे तिथे दिलीप मालवणकर हे आपल्या लेखणीने व वाणीने विरोधात उभे राहतात.मी जेंव्हा २०१९ च्या निवडणुकीत उभा हेतो तेंव्हा माझ्यावर जो अन्याय झाला होता त्यावेळी दिलीप मालवणकर यांनी उल्हासनगर परिसरात माझा जाहिर प्रचार केला व माझ्यापाठीशी ठामपणे उभे राहिले.त्यावेळी त्यांना मोठमोठ्या आॅफर आल्या तरी त्या त्यांनी धुडकावुन लावत मला निवडून आणण्यात मोलाची मदत केली. पक्ष वेगळा असला तरी ते माझे मित्र व हितचिंतक आहेत.त्यांनी समाज ममदिरासाठी केलेल्या मागणीस मी वैयक्तिक व आमदार निधीतून मदत करणार आहे.
दिलीप मालवणकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,मी गद्दारामच्या विरोधात आहे,त्यावेळी गणपत गायकवाड हे युतीचे उमेदवार असल्याने मी त्यांचा वाणी व लेखणीने प्रचार केला होता.यात मी काही विशेष केले नाही. परंतू त्याची जाणीव ठेवत गणपत गायकवाड यांनी अशा तणावपूर्ण राजकिय परिस्थितही जाहिर कबुली दिली,याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे.
या प्रसंगी माजी नगर सेवक राज असरोंडकर, शिक्षक नेते अनिल बोरनारे, हुतात्मा भाई कोतवाल स्मारकाचे शिल्पकार मनोज कोरडे, मन्सुलकर बंधु, सुनंदा आमोदकर,अ.भा.जीवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, हुतात्मा भाई कोतवाल स्मारक समितीचे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.