राशीन परिसरात चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास कर्जत पोलिसांकडून अटक..
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:एक वर्षांपूर्वी मौजे चिलवडी येथे कोंडाबाई आजिनाथ चव्हाण वय ६५ वर्षे यांचे घरात जबरी चोरी करणाऱ्या सतीश अभिमान काळे यास कर्जत पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे..
याबाबत सविस्तर हकीकत अशी की ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्री फिर्यादी कोंडाबाई अजिनाथ चव्हाण, वय ६५ वर्षे रा चीलवडी तालुका कर्जत या इतरांसोबत आपले घराच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना चार चोरट्यांनी तक्रारदार यांचे गळ्यातील मनी मंगळसूत्र कशाने तरी कापून ओढून घेऊन गेले. सदर आरोपींची नावे सदर आरोपी नामे सतीश अभिमान काळे, पोखरणा अभिमान काळे, निखिल सचिन भोसले, सलमान राजेंद्र भोसले यांची नावे निष्पन्न करून यापूर्वी इतर तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती. आरोपी नामे सतीश अभिमान काळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो कर्जत राशीन रोड वर येणार असल्याबाबत माहिती कर्जत पोलिसांना मिळाली त्यावरून कर्जत पोलिसांनी काल रात्री त्या अटक केले.
आरोपीवर यापूर्वीचे कर्जत कोतवाली श्रीगोंदा व इतर पोलीस ठाण्यात चोरी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत ते खालीलप्रमाणे.
103/2011 भा द वि कलम 307,143,147
120/2011 भा द वि कलम 395
189/2010 भा द वि कलम 396
610/2021 भा द वि कलम 324,143, 147,148, 149
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस जवान श्याम जाधव पांडुरंग भांडवलकर संभाजी वाबळे भाऊ काळे गोवर्धन कदम अर्जुन पोकळे यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास संभाजी वाबळे अर्जुन पोकळे हे करत आहेत.