करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त तसेच जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या २ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी करमाळयाची आई कमला भवानी व संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात पूजअर्चा करून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गोशाळा चारा वाटप, खोखो मैदानाचे उद्घाटन, रक्तदान शिबिराच्या आयोजन आदी कार्यक्रम योजिले आहेत.


रक्तदान शिबिर सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. रक्तदान आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान… या उक्तप्रमाणे करमाळा शहर व तालुक्यातील रक्तदात्यांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून गरजवंतांना त्याचा लाभ मिळवून द्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.