चला,होऊन जाऊद्या !
तुमची कामाख्या देवी तर आमची भराडी देवी !
गद्दारांचे टोळकं भंगारात जाणार !
(दिलीप मालवणकर स्पेशल )
एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वत:चे असे काहीच नाही. त्यांनी शिवसेनेचे नांव चोरले,त्यांनी शिवसेनेचा बाप चोरला,
त्यांनी शिवसेनेची निशाणी चोरण्याचा प्रयत्न केला,त्यांनी सेना भवनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला,त्यांनी आमचे आदर्श धर्मवीर आनंद दिघे यांना चोरले,त्यांनी आनंद आश्रमवर कब्जा मिळवला. इतके करून त्यांची बकासूरी भुक भागली नाही,म्हणून बाळासाहेबांचा सेवेकरी पासून सुषमा अंधारेताईंचा विभक्त पतीही पळवला.
इतकेसारे पळवले परंतू त्यांना निष्ठावंत शिवसैनिक चोरता आले नाहीत. हे लोक भाजपाच्या सूत्रधाराच्या तालावर नाचणा-या बोलक्या कठपुतळी बाहुल्या आहेत. शिवसेनेस कमकुवत करण्याचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर या बाहुल्यांचे दोर दिल्लीचा सूत्रधारच कापुन टाकेल व यांची अवस्था ना घरका ना घाटका होऊन ही गद्दार सेना भंगारात जाईल. महाराष्ट्रातील असंख्य जागृत देव-
देवता सोडून ते आसामच्या कामाख्या देवीला गेले.त्यासाठी एअरबस हायर करायला पैसे कुठून आणले ? बीकेसीतील डुप्लिकेट दसरा मेळाव्यासाठी कोट्यावधी कुठून आणले ? गद्दारांचा पक्ष मान्यता प्राप्त नसल्याने त्यांना देणग्या मिळू शकत नाहीत.मग हा पैसा कुठून आणला ?याचा हिशेब कामाख्या देवीला द्या.
जगात असा कोणताही देव-देवी नाही जी गद्दारांना पावेल.कामाख्या देवीचा या गद्दारांवर नक्कीच कोप होऊन येत्या दोन महिन्यात हे असंवैधानिक सरकार कोसळेल.नव्हे ते कोसळावे यासाठी मी आमच्या कोंकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीला नवस करीत आहे.जसे बाळासाहेब बोलायचे तुमच्याकडे दाऊद आहे तसा आमच्याकडे गवळी आहे.त्याच धर्तीवर मी या गद्दारांना सांगतो चला होऊन जाऊद्या ! तुमची कामाख्या देवी तर आमची अस्सल महाराष्ट्रीयन भराडी देवी. ज्या दिवशी हे गद्दारांचे सरकार कोसळेल तेंव्हा मी माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांना कोंकण रेल्वेने मालवणला नेऊन भराडी देवीचा नवस फेडेन.आमच्याकडे एअर बस घेण्याची ऐपत नाही व आलिशान हाॅटेलमध्ये राहण्याची कुवत नाही कारण आमच्याकडे हरामाची कमाई नाही.आमच्या देवीला रेडे लागत नाहीत वा ती “लाल” कपड्याचा प्रसाद देत नाही.तिला लागतो हार फुलं व नारळाचा नैवेद्य व ती देते सात्विक प्रसाद !
मग चला होऊन जाऊद्या !कामाख्या देवी × भराडी देवी ! तुम्हाला लिहून देतो जारण मारण तारण व काळी जादुवाल्या कामाख्या देवीपेक्षा आमची भराडी देवीच शक्तिमान असून ती असूरांचा नायनाट करून निष्ठावंतांना वरदान देते. त्यामुळे अंतिम विजय हा आमचाच होणार व मिंध्यांचे गद्दार टोळके भंगारात जाणार !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०