June 30, 2025 12:40 am

नाथपंथी डवरी गोसावी समाज्याचा यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार झालाच पाहिजे;अमोल शिंदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाथपंथी डवरी गोसावी समाज्याचा यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार झालाच पाहिजे;अमोल शिंदे

(निलेश गायकवाड )

भिगवण : नुकतीच मुंबई हायकोर्ट कर्मचारी क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल मदनवाडी येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने अमोल अंकुश शिंदे यांचा सत्कार घेण्यात आला.

यावेळी शिंदे यांनी बोलताना सांगितले नाथपंथी डवरी गोसावी समाज्याचे मतदान मदनवाडी येथे जनगणना न झाल्याने अंदाजे 400 ते 500 असल्याने कित्येक वर्षापासून समाज विविध सुख-सोयी सुविधांपासून लांब राहिला आहे. समाजावरती वेळोवेळी अन्याय झाला आहे. समाजाचे प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे यंदाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले प्रश्न परखडपणे मांडण्यासाठी व समाजाला न्याय मिळण्यासाठी आपला नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा उमेदवार झालाच पाहिजे.व समाज एकत्र व एकजूट राहिला पाहिजे असे बोलताना सांगितले

यावेळी मा. ग्रामपंचायत सदस्य सतीश शिंगाडे,शामराव शेगर, विष्णुपंत आहेर, संजय शिंदे, रमेश आहेर, दिनेश शिंदे, संजय शिंदे, नामदेव तांबे, योगेश शिंदे, नंदकुमार सावंत तसेच समाज बांधव उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!