दौरा सुरु पण केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेलांच्या साधेपणाचीच चर्चा; टपरीवर घेतला चहा, स्वतः दिले बिल
(निलेश गायकवाड )
भिगवण(मदनवाडी)-केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेल यांच्या साधेपणाचा अनुभव मदनवाडी करांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्या दरम्यान सर्वांना आला.
शनिवारी बारामती येथील नियोजित कार्यक्रम संपवून सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पुढील दौऱ्याकडे परतत असताना केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेल यांचा ताफा अचानक मदनवाडी चौकातील श्रीमती गंगुबाई वाघमोडे यांच्या टपरीजवळ थांबला. केंद्रीय राज्यमंत्र्याचा ताफा थाबंल्याने सारे कुतूहलाने पाहत होते. तेवढ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेल गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या टपरीवरील चहाचा आस्वाद घेतला. व बिल देखील स्वतःच दिले त्यामुळे उपस्थितांची मने जिंकली, त्यांच्या साधेपणाची चर्चा बारामती लोकसभा मतदार संघात चांगलीच जोर धरू लागली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत या वेळी मा. मंत्री हर्षवर्धन पाटील, मा. मंत्री राम शिंदे गणेश भेगडे,मारूती वणवे,तेजस देवकाते व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
