अमळनेरचे सुपुत्र पृथ्वीराज नेतकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…
संपूर्ण खानदेशातून शुभेच्छांच्या वर्षाव….
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज सुधाकर नेतकर यांचे नुकताच वाशिम येथे येथे संघर्ष नायक मीडिया यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2022 द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरीमुळे तसेच तळागाळातील शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पृथ्वीराज नेतकर यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत, संघर्ष नायक मीडिया वाशिम यांनी निवड केली आहे, नेतकर यांचे वडील CISF मध्ये अधिकारी पदावर असताना कोरोनाच्या काळात कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता, दुःखाचा डोंगर सावरत आपल्या समाजकार्याच्या ठसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटवला आहे, त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार मिळाला असून संपूर्ण खानदेश विभागातून पृथ्वीराज नेतकर यांच्या कौतुकाच्या तसेच अभिनंदन होत आहे.