अभाविप प्रांतकार्यसमिती बैठक अमळनेरला संपन्न
अमळनेर येथे दि.१६ ऑक्टोबर ला अभाविप प्रांत कार्यसमिती बैठक संपन्न झाली. बैठकीत उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा येथून ३१ प्रतिनिधी उपस्थित होते. भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व अभाविपच अमृत महोत्सवी वर्ष असल्याने पुढील वर्षभरामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध अभियानांचे नियोजन यावेळी झाले. त्यात सामाजिक सद्यास्थता,५७वे प्रदेश अधिवेशन परभणी,संघटनात्मक सद्यस्थिती,सदस्यता अभियान, एक कोटी वृक्ष लागवड अभियान , एक कोटी रक्त गट सुची अभियान,सेल्फी विथ कॅम्पस युनिट , राष्ट्रीय अधिवेशन जयपूर,राज्यस्तरीय कार्यक्रम – (डिपेक्स, प्रतिभा संगम, महाराष्ट्र रंग),विद्यार्थिनी कार्य बैठक व कार्यशाळा, मिशन साहसी, ऋतुमती अभियान,जिल्हा अभ्यासवर्ग,आगामी कार्यक्रम व उपक्रम – जनजाती गौरव दिन, स्त्री शक्ती दिन, छात्र शक्ती नोंदणी, महाविद्यालय अध्यक्ष व उपाध्यक्ष प्रशिक्षण,जिल्हा संमेलन यावर चर्चा झाली.
विविध क्षेत्रात चाललेल्या या बैठकीत पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री देवदत्त जोशी ,पश्चिम क्षेत्रसह संघटन मंत्री राय सिंहजी, प्रांताध्यक्ष सारंग जोशी(बीड), प्रदेश मंत्री अंकिता पवार(लातूर) ,विभाग संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपते(गंगा खेड) ,प्रांत उपाध्यक्ष प्रा.मनिष जोशी(जळगाव), प्रा. सुरेश मुंडे(संभाजीनगर) सर्व जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व व्यवस्था अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पहिली. बन्सीलला पॅलेसचे संचालक बजरंग अग्रवाल, नीरज अग्रवाल यांनी भरीव सहकार्य केले.यावेळी अमळनेर शहरातील अभाविपचे सर्व जुने व नवे कार्यकर्ते हजर होते.