दौंडकरांनी जर ठरवलं तर ते करतातच ….
संविधान स्तंभाजवळ वंदे मातरम् जीआर ची केली होळी
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – शहरातील सर्व पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केला. तसेच ०३\१०\२०२२ रोजी दौंड तहसीलदार व दौंड पोलिस स्टेशन मध्ये निवेदन दिल्या नतंर दौंड येथील संविधान स्तंभा जवळ निषेध नोंदवला होता व ईमेल द्वारे मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून त्वरीत परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली होती. जर परिपत्रक रद्द नाही केले तर ०५\१०\२०२२ रोजी दसरा दिवशी या परिपत्रकाची होळी करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज ०५\१०\२०२२ रोजी सर्व पक्षाचे पदाधिकारी व नेते, कार्यकर्ते एकत्र येऊन या परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे व त्याच्या कार्यकर्ते यांनी या आंदोलनास पाठीबा दिला. तसेच अध्यक्ष मानवाधिकार व भ्रष्टाचार संघटना तालुका भारत सरोदे, व वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी तीव्र स्वरूपात आपले विचार मांडले. यावेळी पॅथर जयदीप बगाडे न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य, श्रीकांत शिंदे बौद्ध धम्मसेवा संघ दौंड, अध्यक्ष MIM चे मतीन शेख, रिक्षा वाहतूक संघटना भाजपाचे अध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेवक नागसेन धेडे, दौंड शहर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष दीपक सोनवने, दौंड तालुका काँग्रेस पक्षाचे महासचिव प्रकाश सोनवने, मनसे दौंड शहर अध्यक्ष संदीप बोराडे, अजय गायकवाड दलित पॅथर दौंड तालुका सचिव, अनिल साळवे माजी नगरसेवक, इत्यादी मान्यवर व हया परिपत्रकाला विरोध करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.