June 30, 2025 11:33 pm

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा !

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा !

(निलेश गायकवाड )

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव इंदापूर व बावडा येथे नागरिक व कार्यकर्त्यासमवेत बुधवारी ( दि.5) सायंकाळी उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी रत्नाई व भाग्यश्री बंगलो येथे आयोजित समारंभात उपस्थित शेकडो नागरिकांना विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा व साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेला सण म्हणजे दसरा ! यावेळी हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला व वडिलधाऱ्यांचे आशीर्वादही घेतले. त्याचप्रमाणे जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनीही महिला भगिनी, कार्यकर्त्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.

       

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!