June 30, 2025 6:41 pm

दसरा मेळावा हा एक उत्सव आहे
डुप्लिकेट दसरा मेळावा सूडवृत्तीचा गोंधळ आहे !

अपनी भाषा में पढ़े! Translate

दसरा मेळावा हा एक उत्सव आहे
डुप्लिकेट दसरा मेळावा सूडवृत्तीचा गोंधळ आहे !
आमचं‌ ठरलं आम्ही शिवतीर्थावरील ओरिजिनल दसरा मेळाव्यास जाणार !
(दिलीप मालवणकर यांचा बिनधास्त लेख)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास 55 वर्षांची परंपरा आहे.शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली आणि 30 ऑक्टोबर 1966 साली दसरा मेळावा सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे. अनेक उलाढाली झाल्या, वादळं आली आणि क्षमली मात्र कोरोनाचा काळ वगळता दसरा मेळाव्याची परंपरा अखंडित राहिली.


हा दसरा मेळावा हायजॅक करू पाहणारे फुटीर व गद्दार नेते पहिल्या दसरा मेळाव्याच्या वेळी एकतर जन्मले तरी नव्हते किंवा लंगोटीतच शी शू करीत असतील किंवा तोंडात बोटं घालून चोखत चोखत बोबडे बोल बडबडत असतील.
मुळ तिरूपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा एकच असतात पण हौसेगौसे आपली हौस भागवण्यासाठी प्रती बालाजी,प्रती शिर्डीची निर्मिती करतात.पण मुळ तिरूपती व मुळ शिर्डीची सर त्यांना कधीच येत नाही.तसेच एकनाथ शिंदे यांनी भरवलेला दसरा मेळावा हा प्रती दसरा मेळावा आहे. देव नसलेला देव्हारा कसा सुनासुना भासतो ! तसा या मेळाव्यात 10। हजार बसेस भरून‌ जरी गर्दी जमवली तरी ती रिकाम्या देव्हा-याला कशी प्रसन्न करू शकेल. शिवसेनेचा देव या गद्दारांच्या जवळपासही फिरकणार नाही.कारण यांनीच या देवाने रूजविलेल्या शिवसेनेचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे.त्याच्या पुत्राचा केसाने गळा कापला आहे,पाठीत खंजीर खुपसला आहे.
भाजपाने हे चाळीस गद्दार आपल्या गोठ्यात बांधून ठेवले व त्यांना चारा दाणा पाणी खाऊ घालत आहे. या गद्दारीची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्री पदाचे गाजर दिले आहे. एव्हाना एकेकाचे पंख छाटण्यास व नालबंदी करण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचा पहिला बळी प्रतापी सरनाईक ठरणार आहे. इतर आमदार खासदार आज सुपात असल्याने आनंदी असल्याचे भासवत असले तरी ते कधीही जात्यात भरडले जाण्याच्या तयारीत आहेत. मिंधे सरकारच्या मर्यादा व मिंधेपणा भाजपाच कावेबाजपणे जाहिर करीत आहे. दिल्ली दरबारी वेटींग तर महाराष्ट्रात फडणवीस यांनी ओव्हरटेक करून त्यांची योग्यता अधोरेखित केली आहे. हे औट घटकेचे मिंधे सरकार पाडून भाजपा स्वत:चा सत्ताधिश म्हणून राज्याभिषेक करून घेण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यांच्या विरोधात निर्णय द्यावा व काट्याने नायटा काढावा,अशी भाजपाची कपटनिती आहे.
त्यामुळे गद्दारांचा हा प्रती दसरा मेळावा पहिला व अखेरचाच ठरणार आहे,याबाबत आमच्या मनात अजिबात शंका नाही. पुर्वीच्या काळी गल्ली बोळात रामायणाचे प्रयोग रामलिला या नावाने करणारे काही कलाकार रामायणातील विविध पात्रं रंगवित असत.त्यात स्त्री पात्र देखील पुरूषच करत, त्यावेळी स्तनांच्या जागी लावलेले कापडी गोळे निसटून‌ त्यांचा हसा होत असे. याची या प्रती मेळाव्याच्या निमित्ताने आठवण झाली कारण झंडु बाम लावून रडण्याचे सोंग करणारे सोंगाडे यांच्यात आहेत. आत्ता तेच ज्या पद्धतीने गरळ ओकत आहेत, त्यावरून त्याचे नकली अश्रू ज्याला मराठीत नक्राश्रू म्हणतात ते दिसू लागले आहेत.
असो, माननीय हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला व ज्या मेळाव्यांना बाळासाहेबांचा पवित्र पदस्पर्श झाला व जेथे बाळासाहेबांनी आपल्या विचारांचे सोने उधळले व मरगळलेल्या मनांवर फुंकर मारून मनं चेतवली तोच पवित्रभूमी शिवतिर्थावरील खरा दसरा मेळावा, BKC या नावातच भरकटलेली, कमनशिबी कार्टी हा शब्द सामावला आहे. त्याला शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची नखा एवढीही सर येणार नाही.
शिवतिर्थावर असेल‌ ती निष्ठावंतांची दर्दींची गर्दी तर बीकेसीत बसेस भरून भरून आणलेली नुसती गर्दी. चला तर आपण स्वाभिमानी ख-या हिंदूत्ववादी शिवसेनेचे सोनं लुटायला शिवतीर्थावर जाऊया व ज्यांना शिवसेना द्वेषाचे विखार ऐकायचे असतील व भाजपाची स्क्रिप्ट ऐकायची असेल‌ त्यांनी भरकटलेल्या कमनशिबींच्या डमी मेळाव्यास जावे.
दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!