June 30, 2025 10:40 pm

बोरगांव वि का सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोरगांव वि का सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेत मागील वार्षिक सभेचे प्रोसिडींग वाचून दाखविण्यात आले तसेच सन २०२१-२२ ची आर्थिक पत्रके वाचून मंजुर करण्यात आलीत. मागील वर्षभरात मयत झालेल्या सभासदांची यादी बनवून वारस लावण्याबाबत सभासदांना आव्हान करण्यात आले.

गावातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना सोसायटीच्या नावे आहे परंतु सद्यस्थितीत बाहेर गावाचा रेशन दुकानदार रेशन वाटप करीत आहे त्यावर विस्तृत चर्चा झाली असता स्वतः धान्य वाटप सोसायटी मार्फत करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.

यावेळी सचिव नरेंद्र दुर्योधन गिरासे यांनी सभेपुढे येणाऱ्या विषयांची यादी वाचून दाखवली व सोसायटीचे अंदाजपत्रका विषयी सभासदांना माहिती दिली.

सभेस चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया, व्हाईस चेअरमन दगेसिंग राजपूत, संचालक पदमसिंग बहादूर राजपूत, गोकुळ चिंधा येशी, खंडू झिंगा राजपूत, हिरालाल चिंधा पाटील, रघुनाथ झुलाल कोळी, लोटन शंकर धनगर, रजेसिंग भुता राजपूत, भटेसिंग पोलदसिंग राजपूत, हरी उत्तम भिल, विमलबाई सुजानसिंग राजपूत, मंगला जगतसिंग राजपूत तसेच माजी सरपंच नारायण लकडू राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, सोसायटी सभासद रोहिदास कोळी, भटेसिंग भुतेसिंग राजपूत, जयराम पोपट पाटील, कौतिक तोताराम न्हावी, तानकु भिल, दगा बुधा महाजन, भिमसिंग राजपूत, श्रावण ओंकार पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!