June 29, 2025 9:09 pm

विकाऊ शिक्षक मतदार हेच आमदार रामनाथ मोतेसर यांचे मारेकरी , अभिवादन सभेत दिलीप मालवणकर यांचा घणाघाती आरोप

अपनी भाषा में पढ़े! Translate

उल्हासनगर : उल्हासनगरात राहणारे व कोकण शिक्षक मतदार संघातील लोकप्रिय व कर्तुत्ववान माजी आमदार रामनाथ मोतेसर यांच्या अकाली मृत्युस पैसे घेवुन मतदान करणारे विकाऊ शिक्षकच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यानी मोतेसराना अभिवादन करताना केला आहे .उल्हासनगर कॅंप ४ येथिल एन सी टी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत मोते सराना महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत मालवणकर बोलत होते . उल्हासनगर येथे राहणारे व कोकण शिक्षक मतदार संघातील लोकप्रिय व कर्तुत्ववान माजी आमदार रामनाथ मोते सर यांचे गेल्या वर्षी अकाली निधन झाले . त्यांच्या स्मृतिना उजाळा देण्यासाठी व अभिवादन करन्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनाचे राज्य कोषाध्यक्ष देविदास नरवाडे आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष राजेंद्र गवळी यानी एन सी टी विद्यालयाच्या सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन केले होते . या सभेच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधीर घागस हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर , विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेचे अध्यक्ष विष्णु पाटील , एन सी टी विद्यालयाचे संचालक प्रकाश चौधरी हे उपस्थित होते. दरम्यान या अभिवादन सभेला मोठ्या प्रमाणात शिक्षकानी उपस्थित राहुन मोतेसराना अभिवादन केले . दरम्यान अभिवादन करताना मालवणकर यानी घणाघाती आरोप केला . ते म्हणाले की मोतेसरांच्या अकाली मृत्युस पैसे घेवुन मतदान करणारे विकाऊ शिक्षक मतदार हेच जबाबदार आहेत शिक्षक हे विद्यार्थी घडवन्याचे काम करतात . तेंव्हा त्यांनी अशा मार्गाचा अवलंब करायला नको होता . या अभिवादन सभेचे सुत्रसंचालन राजेश गवळी यानी केले .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!