June 29, 2025 3:27 pm

इंदापूर तालुक्यातील पहिलेच आयर्न मॅन ठरलेले राजेंद्र ठवरे व त्यांची टीम यांचा सत्कार भिगवण येथे

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर तालुक्यातील पहिलेच आयर्न मॅन ठरलेले राजेंद्र ठवरे व त्यांची टीम यांचा सत्कार भिगवण येथे

(निलेश गायकवाड )

कझाकिस्तान नूर सुलतान या देशात आयर्न मॅन ची स्पर्धा झाली, त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील पहिलेच Iron Man ठरलेले राजेंद्र ठवरे तसेच बारामती येथील अवधूत शिंदे, ओम सावळे पाटील, दिग्विजय सावंत व विपुल पटेल या पाचही आयर्न मॅन चा नुकताच रयत शिक्षण संस्था चे भैरवनाथ विद्यालय भिगवण येथे सत्कार समारंभ पार पडला… यावेळी बोलताना राजेंद्र ठवरे म्हणाले की मी एक एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर असून माझे बालपण व पूर्ण शिक्षण भैरवनाथ विद्यालय भिगवन येथे झाले आहे.. या आयर्न मॅन स्पर्धेत एकंदरीत शरीराचा व मनाचा कस लागतो, आम्ही गेले तीन ते चार वर्ष याचा सराव करत असून यामध्ये यामध्ये 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग तसेच 42.2 किलोमीटर रनिंग हे एकंदरीत सर्व अंतर 16 तासाच्या आत पूर्ण करायचे असते, ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले… रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे म्हणाले की शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा परीक्षा किंवा अशा स्पर्धांसाठी बालपणापासूनच गोडी निर्माण करून त्याची सराव करणे गरजेचे आहे… आत्ताच्या काळामध्ये व्यायाम करून फिटनेस ठेवणे हे आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहेत म्हणून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे… यावेळी आयन मॅन विपुल पटेल यांनी मनोगत व्यक्त करून तेथील स्पर्धे मध्ये कशा अडचणी आल्या व त्यावर कशाप्रकारे मात केली हे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले…. या कार्यक्रमासाठी सायकल क्लबचे अध्यक्ष श्री केशव भापकर व सर्व सदस्य तसेच रोटरी क्लब भिगवन चे सर्व सदस्य आणि भैरवनाथ हायस्कूल मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते…. कार्यक्रमाचे नियोजन अल्ताफ शेख,औदुंबर हुलगे,संतोष सवाने, रियाज भाई शेख यांनी केले तसेच सूत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी केले व आभार भैरवनाथ हायस्कूलचे प्राचार्य श्री गावडे सर यांनी केले…..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!