June 30, 2025 11:37 pm

केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी महाराष्ट्रातल्या ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी महाराष्ट्रातल्या ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड
(निलेश गायकवाड)
गुन्हे तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी यंदा राज्यातल्या ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

यावेळी १५१ पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे. त्यात राज्यातल्या पोलीस उपायुक्त-कृष्णकांत उपाध्याय, निरीक्षक – प्रमोद भास्करराव तोरडमल, दिलीप शिशुपाल पवार, दीपशिखा दीपक वारे, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, जितेंद्र बोडप्पा वानकोटी, समीर सुरेश आहीरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक – मनोज मोहन पवार, राणी तुकाराम काळे,उप विभागीय पोलीस अधिकारी – अशोक तानाजी वीरकर, अजित भागवत पाटील यांचा समावेश आहे.

याबरोबरच साबीआयच्या १५ अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे. त्यात मुंबईतले निरीक्षक संभाजी निवृत्ती मुरकुटे आणि अमित श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!