राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू, नाशिकमधील घटनेने हळहळ
प्रतिनिधी-एकनाथ भामरे
नाशिकच्या सातपूर परिसरात राष्ट्रगीत सुरू असताना माजी सैनिक जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झालाय.
राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा (Ex Serviceman) मृत्यू झालाय. चंद्रभान मालुंजकर असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात राष्ट्रगीत सुरू असताना मालुंजकर जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नाशिक शहरातील सातपूर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येत होती. राष्ट्रगीतासाठी सर्व मान्यवर उभे होते. राष्ट्रगीत सुरू असताना अचानक उपस्थित माजी सैनिक जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा मृत्यू, नाशिकमधील घटनेने हळहळ pic.twitter.com/lMA7RyRZJX
— मार्मिक समाचार (@K3OJ2GdbjPosj8U) August 9, 2022
सातपूर सातपूर परिसरातील संदीप नगरे येथील खासगी शाळेत ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक चंद्रकांत मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच मालुंजकर यांना अस्वस्थ वाटू लागले. राष्ट्रगीत संपताच ते चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मालुंजकर हे 1962 च्या युद्धात सहभागी होते.