श्रीक्षेत्र विटनेर येथे श्री सद्गुरू संत तानाजी महाराज यांचा सप्तपतपुर्ती समाधी सोहळा
विटनेर येथील संत श्री सद्गुरू संत तानाजी महाराज यांचा समाधीला ८४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संत तानाजी महाराज यांचा सप्ततपपूर्ती समाधी सोहळा संपन्न होत असून त्यानिमित्त सद्गुरू संत तानाजी महाराज यांच्या पादुकांचे बुऱ्हाणपुर फिरस्ती चे आयोजन करण्यात आले असून विटनेर येथे तीन दिवसाच्या कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ५ ऑगस्ट रोजी फिरस्ती चा प्रारंभ झाला असून अमळनेर येथे विजय मारूती मंदिर ते संत तानाजी महाराज मठापर्यंत श्रींच्या पादुकांची भव्य शोभायात्रा,रात्री ८ ते १० हभप गुलाबराव महाराज लोणकर यांचे श्री संत तानाजी महाराज मठावर कीर्तन दि. ६ ऑगस्ट रोजी श्रींच्या पादुकांची पूर्ण अमळनेर शहरांमध्ये फिरस्ती,रात्री ८ ते १० दोडे गुजर बोर्डिंग येथील दुसरा मुक्काम हभप जयेश महाराज निमकर यांचे किर्तन, दि.७ ऑगस्ट कलाली तिसरा मुक्काम हभप जयेश महाराज वाघाडी यांचे कीर्तन, दि.९ ऑगस्ट रोजी वाळकी मुक्काम हभप धीरज महाराज रुंधाटिकर यांचे कीर्तन, दि.९ तारखेला सकाळी ८ वाजता पादुकांचे श्री क्षेत्र विटनेर येथे आगमन व श्रींच्या पादुकांचे भव्य शोभायात्र रात्री हभप अंकुश महाराज मनवेलकर यांचे कीर्तन, दिनांक १० ऑगस्ट रोजी हभप गोप्रेमी गजानन जी महाराज वरसाडेकर यांचे किर्तन,दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १०.३० ऍड.हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे काल्याचे कीर्तन,११ वाजता महाप्रसाद,रात्री ८ ते १० वाजता भारुडा चा कार्यक्रम होईल आणि विटनेर येथील कार्यक्रमाची सांगता होईल.
दिनांक १२ ऑगस्ट रोजी विटनेर येथून संत तानाजी महाराजांच्या पादुका पुढे चोपडा कडे रवाना होतील चोपडा,यावल,रावेर,बुऱ्हाणपूर मार्गे दि.१९ तारखेला मोहद (मध्य प्रदेश) येथे पोहोचणार असून त्याच दिवशी सद्गुरू संत तानाजी महाराजांचे वंशज महंत प्रा.हभप सुशील महाराज,विटनेरकर यांचे काल्याचे किर्तन होऊन,दि.२० तारखेला सकाळी गुलाल उधळून करून सद्गुरू संत तानाजी महाराज यांच्या बुऱ्हाणपूर फिरस्तीची सांगता होईल,तिथून श्रींच्या पादुका मुक्ताईनगर येथे आईसाहेब मुक्ताईचे दर्शन घेऊन विटनेरकडे रवाना होतील.