स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ९ ऑगस्ट क्रांती दिन साजरा…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून लाखांदूर शहरातील पूज्यनिय महामानवांच्या स्मारकाची साफ सफाई करून प्रतिमेला माल्यार्पण करण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर मा. श्री. ढाकेश्वरजी राउत सर यांच्या हस्ते विश्र्वसंत गाडगेबाबा यांच्या स्मारकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्याचप्रमाणे श्री. संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. नितीन पारधी यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव श्री. भोजराज दादा कडिखाये यांनी केले व आभार प्रदर्शन समितीचे उपाध्यक्ष श्री. गणेश ठाकरे यांनी मानले.
नियोजित कार्यक्रमाला समितीचे माजी सचिव श्री. फागोजी कडिखाये, सदस्य श्री. चंद्रकांत दिवठे, श्री. दिलीप गजबे, श्री. हरिदास राऊत, श्री. सुरेश नेवारे, श्री. संजय वाटगुळे, श्री. मनोहर नेवारे, श्री. आनंद भावे, श्री. डोमा बगमारे, श्री. सचिन तोंडरे, मानव कडीखाये, उन्नती कडीखाये, सतिश कोडापे तसेच गाडगेबाबा चौकातील सुजान नागरिक उपस्थित होते.
