June 29, 2025 2:33 pm

इस्रो येत्या रविवारी अंतराळात तिरंगा फडकावणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

इस्रो येत्या रविवारी अंतराळात तिरंगा फडकावणार
(निलेश गायकवाड)

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो येत्या रविवारी 7 ऑगस्टला एक व्यावसायिक प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार आहे.

श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी हे प्रक्षेपण केलं जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी अशाप्रकारे अंतराळात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती.

अंतराळातील छोट्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात यामुळे भारतच महत्त्व जगात वाढणार असून त्या दृष्टीने हे उपग्रह प्रक्षेपण मैलाचा दगड ठरणार आहे, अस इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितल. या लघुग्रह प्रक्षेपणा बरोबरच भारतातील 75 ग्रामीण विद्यालयातील 750 विद्यर्थिनींननी तयार केलेल्या,आजादी सॅट हा छोटा उपग्रह ही अंतराळात सोडला जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतातील युवतींमध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यांची आवड वाढावी या उद्देशाने इस्त्रोच्या सहकार्याने हा विशेष प्रकल्प राबवण्यात आला होता .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!