July 1, 2025 6:59 am

नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट..

अपनी भाषा में पढ़े! Translate

नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट..

दिल्लीमध्ये केले अभिनंदन!

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

भारताच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) भेट घेऊन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी गुरुवारी ( दि.२१) नवी दिल्लीत पार पडली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू जी ह्या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू जी यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि.२५जुलै ) संपन्न होत आहे. देशाच्या घटनात्मक अशा सर्वोच्चपदी प्रथमच आदिवासी कुटुंबातील सर्वसामान्य महिलेची झालेली निवड ही देशवाशियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानास्पद अशी बाब आहे, असे भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन राष्ट्रपतीशी संवादही साधला.

  

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!