ओबीसी आरक्षण निकालाचे इंदापुरात भाजपकडून स्वागत..
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
इंदापुरात भाजपाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात जो ओबीसींच्या बाजूने निकाल दिला,त्याचे स्वागत भाजपा कार्यकर्ते व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केले. यावेळी पांडुरंग (तात्या) शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला होता,तो सोडविण्यासाठी बांठीया आयोगाची नेमणूक करण्यात आली त्या आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एम्पिरिकल डेटा सादर केला आहे,त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे,असे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता ओबीसी तालुकाध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे,भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, राजेंद्र राऊत, पोपाट (नाना) पवार, दत्तात्रय शिंदे,विशाल फोंडे,अमोल राऊत, अवधूत पवार, गौरव राऊत,अतुल शिंदे,अजय बोराटे,तेजस शिंदे,शिवराज शिंदे,अमजद बागवान, व मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होता.
