July 1, 2025 1:08 am

विद्या प्रतिष्ठान येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्या प्रतिष्ठान येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

(निलेश गायकवाड )

विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना व नवकल्पनांना वाव देण्यासाठी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल बिल्ट, भिगवण येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले.प्रदर्शनाचे उद्घाटन शिव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.संपत बंडगर यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपले पर्यावरण’ या संकल्पनेशी संबंधित जलचक्र, शरीर संरचना, ‘पाणी वाचवा,वसुंधरा वाचवा’, वाहतूक व्यवस्था,प्रदूषण इत्यादी विविध प्रतिकृती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संपत बंडगर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना नवनवीन संकल्पना मांडण्यास प्रोत्साहित केले.निर्मला अडेपल्ली, रेखा जाधव सोनाली साळुंखे आणि सोनम शितोळे या विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात योगदान दिले. तसेच निर्मला अडेपल्ली, रेखा जाधव सोनाली साळुंखे आणि सोनम शितोळे या विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात योगदान दिले. पालकांनी भरघोस प्रतिसाद देत विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!