July 1, 2025 6:56 am

योगा फॉर ह्युमॅनिटी ‘ या थीम अंतर्गत विद्या प्रतिष्ठान स्कूल, भिगवण येथे योगदिन उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

योगा फॉर ह्युमॅनिटी ‘ या थीम अंतर्गत विद्या प्रतिष्ठान स्कूल, भिगवण येथे योगदिन उत्साहात साजरा

(निलेश गायकवाड )
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित , योगाच्या उपयुक्ततेचा संदेश देण्यासाठी विद्या प्रतिष्ठान स्कूल, बिल्ट , भिगवण येथे २१ जून २०२२ रोजी योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात भिगवण येथील डॉ. पद्मा खरड यांनी योगसाधना, योगाचे महत्व , आसन करण्याची योग्य पद्धत याविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थीदशेमध्ये शरीर निरोगी व मन शांत राहणे किती आवश्यक आहे आणि यासाठी योगसाधना कशी उपयुक्त आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके करून उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती सरिता शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच श्री . नवनाथ इंगळे व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा योगदिन यशस्वीपणे पार पडला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!