July 1, 2025 4:20 am

पत्नीकडून ४० लाखांची फसवणूक झालेल्या व्यक्तीला मिळाला न्याय..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्नीकडून ४० लाखांची फसवणूक झालेल्या व्यक्तीला मिळाला न्याय..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

बँक व्यवस्थापनाशी संगणमत करून पत्नीने पतिची संयुक्त बँक खात्यातील ४० लाख रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बँकेच्या व्यवस्थापनासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नोएला डँरेल रसकिन्हा ( वय ४५), फ्लाविया पँन्ड्रानिला परेरा, डेरेक रॉबिन्स (रा.वाघोली) यांच्यासह एचडीएफसी बँकेच्या बोट क्लब रोड शाखेचे बँक मॅनेजर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

    

सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, सदर प्रकरणातील मूळ फिर्यादी डँरेल इव्हान रसकिन्हा (वय ४९) यांची त्यांच्या पत्नी कडून ४० लाखांची फसवणूक झाली असतानादेखील संबंधित पोलिस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती. त्यामुळे मूळ फिर्यादी यांनी ॲड.सचिन झालटे-पाटील, ॲड.माधवी वसंतराव पवार यांच्या मार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.जि.डोलारे कोर्ट यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) प्रमाणे दाद मागितली असता,मूळ फिर्यादी यांच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने सदरील प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) प्रमाणे पुढील तपासाकरिता, पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठवण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये पत्नी तसेच तिचा इतर सहकारी विरुद्ध एफआयआर (FIR) दाखल झाली. तसेच मे.न्यायालयाने सदरील पोलीस स्टेशनला २ महिन्याच्या आत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले. विहित मुदतीत अहवाल सादर न केल्यास तपासी अधिकाऱ्यांनी त्याचे स्पष्ट कारण नमूद करावे अन्यथा योग्य ती कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.अशा प्रकारचा आदेश मेहेरबान न्यायालयाने दिला.सदर प्रकरणात मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड.सचिन झालटे-पाटील, ॲड.माधवी वसंतराव पवार यांनी काम पाहिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!