June 30, 2025 9:44 am

बोरगांव येथील आदिवासी कुटुंबाना शिधापत्रिका वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : तालुक्यातील बोरगांव येथील बऱ्याच आदिवासी कुटुंबांकडे शिधापत्रिका नव्हत्या गावाचे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग यांच्या सततच्या पाठपुराव्याने गावातील आदिवासी महिलांना नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.दरवर्षी काही महिने कामानिमित्ताने आदिवासी बांधवांना बाहेरगावी स्थलांतरीत व्हावे लागते म्हणून विविध शासकीय सर्व्हे च्या वेळी आदिवासी कुटुंब त्यांच्या घरी मिळून येत नाहीत ज्यामुळे त्यांना बऱ्याच योजनांपासून वंचित रहावे लागते. बोरगांव येथील आदिवासी कुटुंबांकडे बऱ्याच वर्षांपासून शिधापत्रिका नव्हत्या, आपल्या हक्काचे रेशन कार्ड हवे म्हणून त्यांनी गावाचे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या कडे धाव घेतली.उपसरपंच श्री सिसोदिया यांनी गावात सर्वे केला, किती कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत याची यादी तयार करून तहसिलदार श्री आबा महाजन यांची भेट घेतली व गावातील आदिवासी बांधवांच्या व्यथा मांडल्या. तहसिलदार श्री महाजन यांनी प्राथमिक चौकशी करून पुरवठा निरीक्षक श्रीमती प्राजक्ता सोमलकर यांना बोलवून आदिवासी बांधवांना नवीन शिधापत्रिका देण्याबाबत सूचना केल्या.बोरगांवातील आदिवासी कुटुंबांना बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शिधापत्रिका मिळाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले पहावयास मिळाले. आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा दिसून येत होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!