इंदापूर महाविद्यालयामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
(निलेश गायकवाड )
येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योग साधना करून जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला.
माजीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पतंजली योग समितीचे दत्तात्रय अनपट व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी योगा संदर्भातील विविध आसने करून योगा केला.
संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.
