दौंड शहरात व तालुक्यात माती आणि पाणी परीक्षण केंद्र सुरू करण्याची दौंड काँग्रेस कमिटी ची मागणी
प्रतिनिधी/ विकी ओहोळ
दौंड काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दौंड व दौंड नगर पालिका दौंड यांना निवेदन दिले की, दौंड शहरांत व तालुका कार्य क्षेत्रात शासकीय माती परीक्षण व पाणी परिक्षण केंद्र नसल्याने शेतकरी , सामान्य नागरिक तसेच इतर प्रकल्पातील लोकांना माती व पाणी परिक्षण करण्यासाठी पुणे किंवा इतर ठिकाणी जावे लागते व शहरातील वारंवार होणाऱ्या दुषित गढुळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने या पासून डास ,मच्छर होऊन डेंग्यू ताप, मलेरिया सारख्या आजारांना जनतेला सामोरे जावे लागते सदर पाणी परिक्षण अहवाल येण्यास 15 दिवस ते एक महिना कालावधी लागतो तरी सदर पाणी ,माती परीक्षण केंद्र दौंड तालुका मध्ये सुरू केल्यास नागरिक, शेतकरी व शासनाचा जाणे येणे प्रवास खर्च वाचुन वेळ हि वाचेल असे निवेदन देण्यात आले यावेळी तालुका महासचिव प्रकाश सोनवणे, शहर उपाध्यक्ष महेश जगदाळे, ॲड. अजयकुमार डेंगळे ,पोपट गायकवाड, अतुल थोरात, अक्षय ओहोळ, सोमनाथ सोडनवर इ. उपस्थित होते.