“वटसावित्री पौर्णिमा”निमित्ताने रोटरी क्लब च्या वतीने वृक्षारोपण व ज्येष्ठ नागरिकांसाठी कॉंक्रीट ची बाकाचे लोकार्पण संपन्न
(निलेश गायकवाड )
आज दिनांक 14 जून रोजी अतिशय महत्त्व असलेला सण तो म्हणजे “वटसावित्री पौर्णिमा” या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो याकरता महिला वर्ग त्यांच्या आसपासच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात.त्याचेच औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ भिगवन च्या माध्यमातून आज वटपौर्णिमेनिमित्त अध्यक्ष संजय खाडे व सौ रेखा खाडे यांच्य हस्ते वटवृक्ष लावण्यात आले त्याचबरोबर पर्यावरण सप्ताह निमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मंगल दृष्टी या ठिकाणी असलेल्या गार्डनमध्ये बसण्यासाठी सिमेंट कॉंक्रीट ची बाके देण्यात आली यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे यांनी मंगल दृष्टी सोसायटीतील नागरिकांचे आम्हाला येथे वृक्षलागवड करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले त्याचबरोबर रंजना आगाव हंगे, सचिन बोगवत, महेश शेंडगे, राजकुमार मुंगळे, राजेंद्र दळवी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संपत बंडगर, संजय चौधरी, रियाज शेख, औदुंबर हुलगे, संतोष सवाने, किरण रायसोनी, सौ रेखा खाडे सौ वैशाली बोगावत, सौ डॉक्टर प्राची थोरात, व नियोजित अध्यक्ष डॉक्टर अमोल खनावरे व पत्रकार निलेश गायकवाड, व सुंदर कुसाळकर, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मंगल दृष्टी सोसायटीचे काकासाहेब धोंडे, राजकुमार मुंगळे, गणेश सुद्रिक पाटील, गणेश ढोणे, अशोक पवार, अण्णा कोकरे, प्रकाश कुलकर्णी, राहुल देवकाते, साबळे काका, सौ कांताबाई धोंडे, उषा दळवी, सविता मुंगळे सौ कोकरे व सौ जाधव उपस्थित होते
यावेळी रोटरी क्लब भिगवन ने केलेल्या कामाबद्दल काकासाहेब धोंडे, यांनी आभार मानले.
