June 30, 2025 11:43 pm

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या राज्यात मतदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या राज्यात मतदान

राज्यसभेच्या १६ जागांसाठी उद्या ४ राज्यात मतदान होणार आहे आणि त्यानंतर लगेच निकाल जाहीर केले जातील. राज्यातल्या ६, राजस्थान आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी ४ आणि हरियाणातल्या २ जागांसाठी उद्या मतदान आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीत इतर राज्यातल्या ४१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यातल्या १४ जागी भाजपा, ४ जागांवर काँग्रेस, ४ जागांवर YSR काँग्रेस, ३ जागांवर द्रमुक आणि २ जागांवर अण्णा द्रमुकचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय ३ जागा बिजू जनता दल आणि प्रत्येकी २ जागा तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाला मिळाल्या आहेत. जनता दल धर्मनिरपेक्ष, समाजवादी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रत्येकी १ खासदार राज्यसभेत गेले आहेत. माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानं अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
कर्नाटकातून भाजपानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राजकारणात उतरलेला चित्रपट अभिनेता जग्गेश आणि विधान परिषदेचे मावळते सदस्य लहर सिंह सिरोया यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसनं माजी मंत्री जयराम रमेश यांना पहिला उमेदवार म्हणून तर मन्सूर अली खान यांना दुसरा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभं केलं आहे. जनता दल संयुक्तनं कुपेन्द्र रेड्डी यांना आपला उमेदवार बनवलं आहे.
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर भाजपा तर्फे घनश्याम तिवारी आणि माध्यम समुदायाचे मालक सुभाष चंद्रा हे भाजपाच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!