July 1, 2025 3:57 am

जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदलीसाठीच्या ऑनलाइन यंत्रणेला सुरुवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदलीसाठीच्या ऑनलाइन यंत्रणेला सुरुवात

ग्राम विकास विभागातर्फे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून सुरु करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून या प्रणालीचं अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते.

ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षक बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि यामध्ये गती येईल असं ते म्हणाले. राज्यात सध्या अंदाजे 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!