प्रतिनिधी/ विकी ओहोळ
दौंड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ५ जून रोजी खोरवडी गावात अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आली उत्सव समिती खोरवडी यांचेकडून जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले यात 51 बाटल्या रक्त संकलन केले त्याच निमित्ताने ३०० वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले बैलगाडी मध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व गजे नुत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पांडुरंग आण्णा मेरगळ ,महेश दादा देवकाते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झालीतर मी अहिल्या बोलतेय फेम सौ. करिष्मा आटोळे- गावडे यांचे व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्ष अंबादास शिपकुले ,उपाध्यक्ष आबासाहेब दगडे आणि सचिन होगे,खजिनदार -शुभम मराडे,सचिव बापु गोरख धावडे, सागर खोमणे,दादासाहेब मराडे, रावा घुले यांनी खोरवडी गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्या बद्दल आभार मानले.