करमाळा (प्रतिनिधी) :- साप्ताहिक कमलाभवानी संदेश चे पत्रकार किल्ला विभाग येथील हरीभाऊ पिंपळे यांचे वडील देविदास पिंपळे (वय ८० ) यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी निधन झाले . त्यांच्या मृत्यूपश्चात एक मुलगा दोन मुली सुन, नातु, नातं असा परिवार आहे. कै. देविदास पिंपळे हे अत्यंत साधारण राहणी व उच्च विचार सरणी अनुसार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सुतार कामामध्ये बैलगाडीचे चाक बनविण्यासाठी ते प्रसिद्ध होते. लोकमान्य टिळक तरुण मंडळास त्यांनी सुतारकामा द्वारे प्रत्येक गणेशोत्सवास सर्वोतोपरी सहकार्य करायचे. त्यांच्या अचानक निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच मार्मिक समाचार च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.