*चोरीस गेलेला ट्रॅक्टर पारोळा पोलिसांनी आरोपीस अटक करून दोन दिवसाचे आत ट्रॅक्टर केला जप्त-
प्रतिनिधी मयुर पाटील
भोकरबारी येथून फिर्यादी नामे चंदू धनसिंग पाटील यांनी त्यांव्हे घरासमोर लावलेला स्वराज -744 कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने रात्री चोरून नेले बाबत पारोळा पो स्टे येथे दिलेले फिर्याद वरून ट्रॅक्टर चार लाख किमतीचा चोरीचा गुन्हा दि 28/5/2022रोजी गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली हे कॉ विनोद साळी, पो ना सुनील साळुंके,पो कॉ किशोर भोई,पो कॉ राहुल कोळी,पो कॉ राहुल पाटील,पो कॉ अभिजित पाटील यांनी तपास चक्र फिरविले असता CCTV फुटेज मध्ये चोरटे ट्रॅक्टर नेतांना दिसून आला,त्यावरून चोरट्याचा शोध घेतला असता चोरटा नामे प्रविन जालिंदर मोरे वय 20 वर्ष रा बोदरडे ता पारोळा यास अटक करून विचारपूस करता गुन्ह्याची कबुली दिलेने त्यांनी चोरलेला स्वराज 744 ट्रॅक्टर हा करंजी शिवारात हॉटेल रॉयल चे पाठीमागे भिंती लागत लपवून ठेवलेने तसे दोन पंच समक्ष निवेदन घेऊन निवेदन प्रमाणे लाऊन ठेवलेला ट्रॅक्टर चार लाख रुपये किमतीचा नमूद आरोपीने काढून दिलेने तो जप्त केला आहे.ट्रॅक्टर मालक याना वाटलेबकी आता पेरणीचे दिवस सुरू होत आहे व माझा ट्रॅक्टर चोरी गेलने आता ट्रॅक्टर मिळणार नाही त्यामुळे नाराजीचा व व्यथित झाले होते परंतु ट्रॅक्टर चा पोलिसांनी शोध लावताच पोलिसांचे आभार मानून फिर्यादिस आनंदाश्रू आवरता आले नाही,व पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे.