अमळनेरात वधू-वर परिचय मेळावा औंरगाबाद सप्तपदी पुस्तकाचे प्रकाशन
औरंगाबाद शहरात प्रथमच श्री गणेश भिकनराव मढीकर यांनी आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्याचे सप्तपदी पुस्तकाचे आज अमळनेर येथे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अमळनेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री चंदूसिंग परदेशी, अमळनेर भाजपाचे शहराध्यक्ष व युवा परीट मंडळाचे उपाध्यक्ष श्री उमेश वाल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे , अध्यक्ष श्री रविद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात भविष्यात होण्याऱ्या तीन राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात सर्व समाज बांधवानी सहभागी व्हावे असे मंडळाच्या वतीने आवाहन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री विनोद जाधव सरयांनी केले, सूत्रसंचालन श्री दीपक वाल्हे सर आणि आभार श्री मोतीलाल जाधव यांनी केले .
याप्रसंगी तालुकाअध्यक्ष श्री गंगाराम वाल्हे यांच्या हस्ते सप्तपदीत नाव नोंदणी केलेल्या समाज बांधवांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले
सदर प्रकाशन सोहळ्यास श्री अनिल वाघ,श्री गणेश नेरकर, श्री मनोज निकुंभ, श्री भरत जाधव, प्रा श्री अनिल पवार सर ,श्री नरहरी बोरसे , श्री सुभाष आगलावे, श्री अविनाश जाधव , श्री विजय वाघ सर, श्री अनिल जाधव, श्री मधुकर निंबाळकर, श्री गणेश चित्ते व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.