June 30, 2025 5:14 am

विखरण ता.एरंडोल येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

विखरण ता.एरंडोल येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन
विखरण तालुका एरंडोल येथे लहान मुलांवर वारकरी संस्कार व्हावेत या उद्देशाने दहा दिवसाचे उन्हाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असून सर्व विखरण ग्रामस्थ याची देही याची डोळा आनंदाचा अनुभव घेत आहेत.
विटनेर येथील सद्गुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा.हभप.सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या मार्गदर्शनाने व समस्त ग्रामस्थ विखरण यांच्या अथक प्रयत्नांनी हा सोहळा संपन्न होत आहे,हे शिबिर दिनांक 18 मे 2022 ते 27 मे 2022 या कालावधीत होत असून या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना सकाळी 5 ते 7 काकडा,हनुमान चालीसा,9 ते 11 अकरा गीतेचा अध्याय,नमन वाटिका,दुपारी 11 ते 12 जेवन,सायंकाळी 2 ते 5अभंग,संगीत बोल व संध्याकाळी 5 ते 6 संगीतमय हरिपाठ इत्यादी शिकवले जात असून रात्री 8.30 ते 10.30 दरम्यान हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे,दि. 18 रोजी हभप धीरज महाराज रुंधाटी,दि. 19 रोजी हभप सागर महाराज पाडळसरेकर, दि. 20 रोजी हभप जयेश महाराज वाघाडी,दि. 21 रोजी हभप ओमशिव महाराज जळगावकर,दि. 22 रोजी हभप सुनिता ताई महाराज पाचोरा,दि.23 रोजी हभप समर्थ महाराज नागदुली,दि. 24 रोजी हभप जितेंद्र महाराज म्हसावदकर,दि. 25 रोजी हभप कुलदीप महाराज बुलढाणेकर,दि. 26 रोजी हभप राजेंद्र महाराज केकतनिंभोरा,व दि. 27 रोजी महंत प्राध्यापक हभप सुशील महाराज विटनेरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होणार आहे.
या शिबिरादरम्यान जिल्हा परिषद सदस्य माननीय नाना भाऊ महाजन यांनी भेट देत शिबिराची उत्तम व्यवस्था बघून विद्यार्थी जेव्हा गावात जाऊन मधुकरी मागतात व संपूर्ण चैतन्यमय वातावरण बघून विखरण गावात जणू आळंदीच उत्तीर्ण झाल्याचे समाधान व आनंद व्यक्त केला आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा चे हभप योगेश महाराज धामणगावकर यांनी सदिच्छा भेट देत विखरण कर मंडळी खूप भाग्यवान असल्याचे समाधान व्यक्त केले असून असे शिबीर प्रत्येक गावी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या शिबिराला कलाकार म्हणून हभप समर्थ महाराज नागदूलीकर, हभप अविनाश महाराज दातरडी,हभप नितीन महाराज विटनेरकर,हभप धीरज महाराज रुंधाटी,हभप जयेश महाराज वाघाडीकर, हभप सुप्रीम महाराज, हभप अनिल महाराज बामनेकर,हभप अक्षय महाराज बामणे,हभप भागवत महाराज वाकटुकी,हभप प्रमोद महाराज बामणे, हभप आकाश महाराज वडगाव,हभप कल्पेश महाराज कुरवेल इत्यादी शिक्षक लाभले असून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता श्री.अनिल पाटील सर, श्री आबा पाटील,श्री.सुनील पाटील, व सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ,महिला व अबाल वृद्ध यांनी मेहनत घेतली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!