राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त मदनवाडी येथे होणार भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
(निलेश गायकवाड )
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.29) रविवारी रोजी मदनवाडी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस मा. सतीश शिंगाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भिगवण व परिसरातील युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन शिंगाडे यांनी केले आहे.
