June 30, 2025 11:43 am

दे टक्का तर मारतो शिक्का
उपायुक्त सुभाष जाधवचे फर्मान !

अपनी भाषा में पढ़े! Translate

दे टक्का तर मारतो शिक्का
उपायुक्त सुभाष जाधवचे फर्मान !
उल्हासनगर महापालिकेस भ्रष्टाचाराच्या दलदलीने ग्रासले आहे,हे मी वारंवार सिद्ध केले आहे.प्रत्येक टप्प्याला टक्केवारी दिल्याशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकत नाही. सद्या फरार असलेल्या सुनील पिंपळे याने तर तब्बल 95 लाख रूपये एका अधिका-यास दिल्याचे जाहिर केले होते व पैसे कसे कसे दिले ? याचा तपशीलही दिला होता.मात्र पाण्यात राहून मगरीशी वैर घेणे परवडणार नाही,याचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी घुमजाव केले होते व 95 लाखांवर पाणी सोडले होते.निवडणूक शाखेतील भ्रष्टाचार लपून राहिलेला नाही.ठेकेदार 20% देऊन फसले आहेत.
या पार्श्वभुमीवर 15 व्या वित्त अंतर्गत पाणी पुरवठा विभागाची online निविदा भरणा-या एका ठेकेदाराची 10 लाखाची निविदा अंतिम मंजूरीसाठी गेली असता उपायुक्त सुभाष जाधव हे झारीतील शुक्राचार्य बनले आहेत.सदर ठेकेदाराच्या फाईली नंतर आलेल्या अनेक फाईली झटपट क्लियर करणारे सुभाष जाधव हे 1 टक्का घेतल्याशिवाय सही करणार नाही,यावर अडून बसले आहेत.ठेकेदाराने विचारणा केली तर माझ्या पीए ला भेटा ! असे सांगण्यात आले.पीए उर्फ कलेक्टर म्हणतात, एक टक्का दिल्याशिवाय साहेब सही करणार नाहीत. याचाच अर्थ दे टक्का तर उमटवतो शिक्का ! हे उल्हासनगर महापालिकेत परवलीचे वाक्य झाले आहे. आयुक्त दयानिधी अशा भ्रष्ट अधिका-यांवर दया करतात,हे प्रियांका राजपूत प्रकरणी आदेशावर स्वाक्षरी करूनही तो जारी न करण्याच्या डरपोकपणाने सिद्ध करीत आहेत. एक प्रकारे आयुक्त या भ्रष्ट अधिका-यांना भ्रष्टाचार करण्याचे बळ देत आहेत. उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडे सदर फाईल 17 मे पासून का प्रलंबीत आहे? याचा जाब विचारण्याचे धाडस आयुक्तांकडे आहे का ? नसल्यास हे आयुक्त दिवस भरणा-या पाटी टाकणा-या कामगारा प्रमाणे वागत आहेत,असे आम्ही का म्हणू नये ?
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!