June 30, 2025 9:43 am

पशुधनाची चोरी करणाऱ्या टोळी चा मुख्य सुत्रदार,सह एकास मालेगावातुन अटक

अपनी भाषा में पढ़े! Translate

पशुधनाची चोरी करणाऱ्या टोळी चा मुख्य सुत्रदार,सह एकास मालेगावातुन अटक
अमळनेर: शेतकरी राजा च्या पशुधना वर डल्ला मारणार्याला मालेगावातुन अटक – अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील बैल व गाय रात्रीच्या वेळी चारचाकी वाहन सोबत आणुन चोरुन नेणाऱ्या टोळीचा मोरक्या रशिद कुरेशी व त्याचा भाऊ शकील हे मागील आठ महीन्यांपासून अमळनेर पोलिसांनी चार गुन्हयात पाहीजे होते. त्यांच्या विरूद्ध कोर्टाने स्टॅण्डींग वॅारंट सुद्धा काढले होते. त्यातील मुख्य सुत्रधार रशीद हा मालेगाव शहरात पाचव्यांदा नवीन लग्न करून संसार थाटुन दडुन बसला आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांनी सहा.पोलीस उप निरीक्षक विलास पाटील, मिलिंद भामरे, साळुंके यांना मालेगाव शहरात पाठवले तसेच तेथील गुप्त बातमीदारांना सक्रिय करत आरोपी रशिद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी अशांना बातमी काढून वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केले आहे. त्यांना अमळनेर पोस्टे गुरनं 495/2021 भादवि कलम 379,34 यामध्ये अटक केले असुन आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!