June 30, 2025 4:39 pm

अमळनेर तालुक्यात ड्रोन कॅमेरा द्वारे गावठाण सर्व्हेक्शनला कन्हेरे गावापासुन सुरुवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यात ड्रोन कॅमेरा द्वारे गावठाण सर्व्हेक्शनला कन्हेरे गावापासुन सुरुवात

अमळनेर प्रतिनिधी -महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने याची सुरुवात दि 20 मे रोजी कन्हेरे गावापासून करण्यात आली.
याद्वारे 133 गावांची तपासणी करण्यात येणार आहे.महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथे याचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रांतअधिकारी सीमा अहिरे मॅडम व तहसीलदार मिलिंद वाघ उपाधिक्षक भूमी अभिलेख बी सी अहिरे,मोहन डेरे,विजय कुमार , आशिष गिरी,कमलेश जोशी व कर्मचारी वृद   व सर्व ग्रामस्थ ग्रामसेवक व तलाठी गावाचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक कमलेश जोशी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!