June 30, 2025 2:27 pm

भिगवण येथील सचिन बोगावत यांना मिळाला इंदापूरभूषण पुरस्कार;साद फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथील सचिन बोगावत यांना मिळाला इंदापूरभूषण पुरस्कार;साद फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त

(निलेश गायकवाड )

भिगवण (ता. इंदापूर ) – भिगवण येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बोगावत यांच्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल साद फाउंडेशन इंदापूर यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने सन 2022 चा ‘इंदापूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करून भव्य सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम हा वालचंदनगर येथील ललिताबाई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या समाजसेवकांचा सत्कार या कार्यक्रमात केला गेला. सचिन बोगावत यांनी सामाजिक क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. रोटरी क्लब, जैन संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नानाविवी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात त्यांचा हिरीरिने सहभाग असतो. त्यांनी आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे वालचंदनगर कंपनीचे मच्छिंद्र शिरसाट, एडवोकेट नितीन कदम,एडवोकेट दिपक लोखंडे,किरण गोफने, मनोज राक्षे,औदुंबर हुलगे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरज वनसाळे, उपाध्यक्ष नागेश भोसले कार्याध्यक्ष दत्तात्रेय राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!