राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना इंदापूरभूषण पुरस्काराने सन्मानित
(निलेश गायकवाड )
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास केल्याची दखल घेत सात फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने मंत्री भरणे यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते इंदापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.
रविवार दिनांक 22 रोजी ललिताबाई मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा झाला यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की आपण राजकारणामध्ये काम करताना गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम केले मिळालेल्या पदाचा सामान्य जनतेच्या विकासासाठी उपयोग केला त्यामुळे मला खूप अभिमान लभाते.
सात फाउंडेशन संस्थेने समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या पुरस्काराने माझ्यासह सर्व पुरस्कार तींना नवीन ऊर्जा मिळेल यावेळी माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की सात फाउंडेशन काम चांगले असून या संस्थेला आपण मदत करू या वेळी वाचन नगर कंपनीचे मच्छिंद्र शिरसाट एडवोकेट नितीन कदम एडवोकेट दिपक लोखंडे किरण गोपने आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे उपाध्यक्ष नागेश भोसले कार्याध्यक्ष दत्तात्रेय राक्षे विश्वस्त आप्पा कदम विश्वस्त वनसाळे विश्वस्त सोमनाथ भोसले सौरभ धनवडे शुभम सुर्वे यांच्या सर्व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
